स्थानिक पातळीवरचा प्रतिसाद पाहुन खुद्द आदित्य ठाकरे मणिपुर जाणार
स्थानिक पातळीवरचा प्रतिसाद पाहुन खुद्द आदित्य ठाकरे मणिपुर जाणार !
मणिपुर मध्ये शिवसेना 9 जागेवर आपले उमेदवार दिले असुन त्याच्या प्रचारासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे तीन चार दिवसापासून मणिपुरात ठाण मारुन बसेल आहे. तेवढेच नाही तर जोरदार प्रचार करत आहे आणि तेथील स्थानिक पातळीवर शिवसेनेला चांगलाच प्रतिसाद देखील मिळत आहे. हे पाहूनच खुद्द युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील मणिपुर चा दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मणिपुर विधानसभेचे मतदान 27 फेब्रुवारीला असुन 22 किंवा 23 ला आदित्य ठाकरे हे मणिपुरला जावुन शिवसेना उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची चर्चा होत आहे. अजुन त्याचा हा दौरा निश्चित नसुन परंतु शिवसेनेला जर महाराष्ट्रा बाहेर वाढायचे असेल तर मोठ्या नेत्याना बाहेरच्या राज्यात जाऊन प्रचार करावाच लागेल.
राज्यातील शिवसेनेचे राज्यप्रमुख मोंटेसिंग यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यात अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत राजकुमार दोरेंद्रो सिंग यांचे चिरंजीवर आर.के.सिंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दोरेंद्र सिंग हे शेवटच्या काळात भाजपमध्ये देखील कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर आर. के.सिंग नव्या पक्षाच्या शोधात होते, त्यांनी शिवसेनेची निवड केली आणि पक्षाने त्यांना उमेदवारी देत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेच्या ९ पैकी दोन उमेदवार हे तगडे म्हणजेच विजय मिळवू शकतील असे आहेत. उर्वरित उमेदवार देखील आपापल्या मतदारसंघात चांगली काम करतील.
No comments