कल्याण डोंबिवलीतील 10 ते 12 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर !



कल्याण डोंबिवलीतील 10 ते 12 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर !


अवघ्या दोन महिन्यांवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना भाजपासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठं खिंडार पडलं असून गेल्या दोन महिन्यांत भाजपाच्या ६ विद्यमान आणि २ माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे हे सर्व नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय एक भाजपा समर्थक अपक्ष उमेदवारानं देखील राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या या पक्षांतरामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.


काही दिवसापूर्वीच कल्याण-डोंबिवली पालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक नितीन पाटील व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रंजना पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत नितीन पाटील यांचे बंधू आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी मट्या पाटील हेही आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या आजी-माजी नगरसेवकांची संख्या आता आठ झाली आहे.


आणि त्यात भर म्हणून अजुन 10 ते 12 नगरसेवक हे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे याच्या संपर्कात असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. हे नगरसेवक निवडणूकीच्या पहिले शिवसेनेत प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहेत.

No comments