गुलाबराव पाटील यांचा भाजपाला जोरदार धक्का ! भाजपाचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
गुलाबराव पाटील यांचा भाजपाला जोरदार धक्का ! भाजपाचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपचे ५७ पैकी तब्बल २७पेक्षा अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपच्या सूत्रांनी देखील दुजोरा दिला. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत.
जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. येत्या १८ मार्च रोजी नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते.
मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर गेले. रविवारी दुपारी दोन वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी तीनच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाउसवर एकत्र झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायंकाळी सातच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे. जळगावमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी जयश्री महाजन यांची उमेदवारी निश्चित केली आहे. उपमहापौरपदाचा उमेदवार जाहीर केला नसला, तरी कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
तुम्ही सुध्दा तुमचे मत खाली Comment Box मध्ये मांडू शकतात
No comments