नाशिक भाजपाचे 15 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर !!

 


नाशिक भाजपाचे 15 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर !!


शिवसेनेला (Shivsena) जोरदार धक्का देत माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांना सोमवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला .

मात्र सानप यांच्या प्रवेशाने भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला आहे . यावरून भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत .


सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला राम-राम ठोकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिका (Nashik Mahanagarpalika) निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.


आणि जवळपास 15 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे आणि शिवसेनेचे नेते हे लवकरच नाशिकला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.


आता पाहिचे हेच आहे की भाजप ही बंडखोरी थांबवू शकेल की नाही. तुम्ही सुध्दा तुमचे मत खाली Comment Box मध्ये मांडू शकतात.

No comments