राणेंना धक्का ! 7 नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

 



राणेंना धक्का ! 7 नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश


महाराष्ट्रात जेव्हा पासुन महाविकास आघाडीच सरकार आले तेव्हा पासुनच हे सरकार निवडणुकीत टीकु शकणार नाही अशी वल्गना भारतीय जनता पक्षाचे नेते करत होते.

परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले आणि शिवसेना एक नंबर चा पक्ष बनला हे आणि राष्ट्रवादी आणि भाजपाला जवळपास सारख्या जागा मिळाल्या. त्या नंतर शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाल्या चे चित्र पाहायला मिळत होते आता त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे माजी सचिव समीर देसाई व माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मेहता शिवसेनेत प्रवेश केला होता.

पन दोन दिवसापूर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सिंधुदुर्गात येऊन गेले आणि आपल्या भाषणात त्यानी शिवसेना संपण्याची भाषा केली ही शिवसेनेची चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसुन आले होते.

आणि आमित शहा यांचा हा दौरा भारतीय जनता पक्षाला उभारणी देणार असे पन सांगण्यात आले होते पन आता अमित शहा च्या दौरया नंतर सिंधुदुर्ग जिल्हातील वैभववाडी तील 7 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि आज ते मुबंईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आणि हा राणे याना मोठा धक्का असल्याचे जिल्हात बोलले जाते आहे 

आता पाहिचे हेच आहे की अजुन किती धक्के भारतीय जनता पक्षाला आणि नारायण राणे यांना शिवसेना देणार

No comments