शरद पवार याच्या नेतृत्वात सर्व विरोधीपक्षांनी एकत्र यावे : संजय राऊत
शरद पवार याच्या नेतृत्वात सर्व विरोधीपक्षांनी एकत्र यावे : संजय राऊत
मुंबई | विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधी पक्षांवरच निशाणा साधला आहे.
सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.
आणि त्या पुढे जाऊन त्यानी शरद पवार याच्या नेतृत्वात देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणुका लढवा असा सल्ला ही दिला.
प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष, त्यांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, अशा शब्दात राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
तुम्हाला या विषयी काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये
No comments