ईडीच्या नोटीस नंतर संजय राऊत यांचे आव्हान ! वाचा संपूर्ण बातमी लगेच
ईडीच्या नोटीस नंतर संजय राऊत यांचे आव्हान ! वाचा संपूर्ण बातमी लगेच
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस बजावली आहे . त्यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीच्या या नोटीसवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. मात्र, त्यांची ही टीका हास्यास्पद असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे.
भाजपची भूमिका नेमकी काय?
“कर नाही त्याला डर असायचं काही कारणच नाही. हा जो काही कांगावा सुरु आहे की, राजकीय द्वेष बुद्धितून हे सर्व केलं जातंय तर हा मोठा जोक आहे. देशात जी न्यायालये आहेत त्यांची दरवाजे कुणीही ठोकू शकतं. त्याला काही अडचण नाही. शिवसेनेने लोकशाही, नैतिकतावर बोलावं? ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या घरावर हल्ला केला, निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला केला, विशेष म्हणजे त्याचं समर्थन संजय राऊत आणि शिवसेनेने केला, त्यांनी नैतिकता बाबत बोलूच नये”, असा घणाघात भाजप नेते अतुल भातकळकर यांनी केला.
“ईडीची नोटीस आलेली आहे. ईडी सिलेक्टिव्ह कारवाई करते, असं त्यांचं म्हणणं हास्यास्पद आहे. परवाच आमदार रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे ज्यांचा विधानसभेत भाजपला पाठिंबा आहे त्यांची 350 कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. हे गेल्या महिन्याभरात घडलेली घटना आहे. त्यामुळे ईडी भाजपविरोधी कारवाई करते हे वस्तुस्थितीला धरुन नाही. माझं संजय राऊतांना एवढाच सल्ला आहे, कांगाऊखोरपणा करु नका. कर नाही त्याला डर कसला. निर्भयतेने कायद्याला सामोरे जा”, असं भातकळकर म्हणाले.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी आपल्या Social Media वरून एका शायरी ने उत्तर दिली.
आ देखे जरा किसमे कितना है दम
जमके रखना कदम मेरे साथीया
तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये
No comments