"मातोश्री"वर तिकिटासाठी इच्छुकांची तुफान गर्दी !
"मातोश्री"वर तिकिटासाठी इच्छुकांची तुफान गर्दी !
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
कोकणातील भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे देखील आज स्वगृही ठाकरे गटात परतत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोललं जात आहे.
नितीन सावंत हे कर्जत नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत. शिवाय ते उत्तर रायगडचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुद्धा आहेत. नगरपरिषदेची निवडणूक लढवून नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी राजकारणात स्वतःला सक्रिय केलं. शिवसेना पक्ष फुटीनंतर कर्जत खालापूर मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बळ देण्याचं काम त्यांनी केलं. पक्षाला नवसंजीवनी देऊन त्यांनी पक्षाची ताकद वाढविली.
मागील लोकसभेला उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना 18 हजार मतांचं लीड त्यांनी मिळवून दिलं. अनेक रोजगार मेळावे घेऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महिलांसाठी पैठणीचा खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन त्यांनी केले आहे. विधानसभेतील ग्रामपंचायतींवर जास्तीत जास्त संख्येने शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवला आहे.
No comments