मंत्री अब्दुल सत्तार यांना धक्का! सिल्लोड मध्ये ठाकरे गटात इन्कमिंग
मंत्री अब्दुल सत्तार यांना धक्का! सिल्लोड मध्ये ठाकरे गटात इन्कमिंग
अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कारभाराला कंटाळून भाजप कार्यकर्ते शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश करणार आहेत.
भाजपचे सुरेश बनकर हे या भाजप कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत आहेत. तालुक्यातील भाजपचे दाेन- चार पदाधिकारी वगळता दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमची कोणावरही नाराजी नाही पण सत्तार हे आम्हाला नेते म्हणून नको. त्यांनी सर्वसामांन्यांची अक्षरश: पिळवणूक चालवली आहे
लोकसभा निवडणुकीनंतर सिल्लोड मतदारसंघात मंत्री सत्तार यांच्या विरोधात रावसाहेब दानवे यांनी आघाडी उघडली होती. जाहीर वाद झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही चिडले होते. तालुक्यतील जमिनी अवैध मार्गाने मिळवणे, सर्वसामांन्यांना त्रास होईल असे वर्तन सातत्याने असल्याने सिल्लोडमध्ये सत्तार नकोसे झाले आहेत.
ही बाब भाजप नेत्यांच्या कानावरही वारंवार टाकण्यात आली होती. मात्र, ‘ महायुती’ च्या तडजोडीमुळे या तक्रारीकडे कोणी लक्ष दिले नाही. सत्तार यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाची धुरा दिल्यानेही भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे सिल्लोड भाजपमधील दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश शुक्रवारी होईल असे सांगण्यात येत आहे.
No comments