गणेश नाईक ठाकरे गटात प्रवेश करणार !
गणेश नाईक ठाकरे गटात प्रवेश करणार !
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. बेलापूर (Belapur), ऐरोली (Airoli) मतदारसंघावर गणेश नाईकांचा दावा असून, जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजत आहे. यानंतर गणेश नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संदीप नाईक हे दोन टर्मचे आमदार आहेत, विकासात्मक चेहरा आहेत. अभ्यासू आहेत. त्यांनी केलेला जनसामान्यांमधील संवाद आणि पक्षातील योगदान पाहता नक्कीच भाजपाने त्यांना उमेदवारी दिली पाहिजे असं भाजपा पदाधिकारी रवींद्र इथापे म्हणाले आहेत. संदीप नाईक यांना डावलण्यात येत आहे असं वातावरण दिसत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना त्यांना कोणत्याही माध्यमातून बेलापूरची उमेदवारी घ्यायला लावायची आणि निवडून आणायचं हा चंग बांधला आहे असं भाजपा पदाधिकारी सूरज पाटील यांनी सांगितलं.
नवी मुंबईमधील राजकारणात गणेश नाईक यांची आतापर्यत एकहाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. पण भाजपाकडून दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता न झाल्याने गणेश नाईक यांनी पुन्हा आपल्या स्वगृही परतावे असा सूर नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी, नगरसेवकांच्या बेठकीत निघाला.
No comments