मीरा भाईदर भाजपाचे 20 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर !
मीरा भाईदर भाजपाचे 20 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर !
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपचे ५७ पैकी तब्बल २७पेक्षा अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपच्या सूत्रांनी देखील दुजोरा दिला. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत.
जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. येत्या १८ मार्च रोजी नवीन महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते.
आणि त्या पाठोपाठ आता काही दिवसांपूर्वीच मीरा भाईदर च्या आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्याच्या सोबत तेव्हा 10 ते 12 नगरसेवक असल्याचे त्यानी थेट बोलुन दाखवले होते. आणि तीच सख्खा आता 20 वर गेल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळाले आहे.
पन या सर्व नगरसेवकांचा पक्ष प्रवेश सध्या होण्याचे प्रमाण कमी आहे. कारण सध्या प्रवेश केल्यास सर्व नगरसेवकाचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्या मुळे निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते आहे.
तुम्हाला या विषयी काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये
No comments