माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

 


माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश 


औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधलं.


औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला अजून एक झटका दिलाय. औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधलं. नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते. आज अखेर नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक आता शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. जिल्ह्यातील एक मोठी सहकारी संस्था ताब्यात आल्यामुळे शिवसेनेचं बळ अधिक वाढलं आहे. आता जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देत सत्तार यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका दिलाय.


तुम्हाला या विषयी काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये

No comments