उत्तरप्रदेश पंचायत निवडणुकीत शिवसेनाने आपले खातं उघडले!



उत्तरप्रदेश पंचायत निवडणुकीत शिवसेनाने आपले खातं उघडले!



उत्तर प्रदेशात जरी शिवसेनेची जास्त ताकद नसली, शिवसेना उत्तर प्रदेशात  निवडणुका लढवत आली आहे. आणि महाराष्ट्रा बाहेर पहिला आमदार सुध्दा शिवसेनेचा उत्तर प्रदेशातुनच निवडुण आला होता.


आणि आता त्याच उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीत शिवसेनेनी उडी घेतली होती आणि त्या साठी उत्तरप्रदेश शिवसेनेचे शिष्टमंडळ मुबंईत येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची व मंत्री अदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. निवडणुका कश्या प्रकारे लढवावी याची माहिती घेतली होती



शिवसेना उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका लढवत आली असली तरी पक्षाला मतदान तर भरभरून मिळते पन त्याचे उमेदवार निवडून येत नाही पन पंचायत निवडणुकीत शिवसेनाचे पंचायत सदस्य आणि सभापती नेहमीच निवडुन येता म्हणुन त्याना पंचायत निवडणुकीत एक Registered पक्ष आहे.


Registered पक्ष होण्यासाठी आपले उमेदवार निवडून येणे आवश्यक असता आणि शिवसेनेचे उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत सभापती असो किंवा सदस्य असो ते प्रत्येक वेळी निवडुन येता.


पन या वेळेस शिवसेना आपली पुर्ण ताकद लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती यांचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका सुध्दा आहे. त्या अनुषंगाने ही आपली जमीनी हकीकत ओलखण्यासाठी खुप महत्वाची निवडणुक असल्याचे सांगितले जात होते


आणि आता त्यातच एक महत्वपूर्ण निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला आहे म्हणजेच उत्तर प्रदेशातील रामगढ जिल्हा आजमगढ मध्ये शिवसेनेचा उमेदवार प्रधान पदाच्या निवडणुकीत विजली झाला आहे.

या विजयाचे शिवसेनेचे उत्तरप्रदेशात आपले खातं उघडले आहे.


तुम्हाला या विषयी काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये

No comments