गोव्यात शिवसेना खातं उघडण्याची शक्यता !
गोव्यात शिवसेना खातं उघडण्याची शक्यता !
गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे आता सगळ्यात महत्वाचा म्हणजेच मतदानाचा दिवस आहे. सकाळ पासुनच गोव्यात जोरदार मतदान नोदंनीला सुरुवात झाली आहे. आणि आता सगळेच निकालात काय होणार ह्याच्या कडे लक्ष्य देत आहे. परंतु प्रत्यक्षात जमीनीवर लोकांना काय वाटते हे सगळ्यात महत्वाच आहे.
आणि त्या नुसार भारतीय जनता पक्षाला गोव्यात आपले सरकार परत स्थापन करता येणार नाही असे सांगण्यात येत आहे. पन काँग्रेस ला सुध्दा संपूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. म्हणून सरकार बनवण्याची चावी आता अपक्ष आणि काही नवीन पक्ष जे पहिल्यांदाच इतक्या जोरात निवडणुकीत उतरलेले होते त्याच्या हातात आहे.
नवीन पक्ष्यांमध्ये सगळ्यात पुढे शिवसेना आणि आम आदमी पक्ष होते. आम आदमी पक्ष लढला खुप जोशात पन आणि मतदान ही चांगलच घेणार पन आमदार मात्र निवडुन येण्याची शक्यता कमीच आहे. पन काँग्रेसचे मतदान नक्कीच कमी केले आहे.
पन मात्र शिवसेनेचे या वेळेस खात उघडणार असे सांगण्यात येत आहेत कारण पेडणे आणि मापुसा मध्ये शिवसेना आपले उमेदवारला निवडुन आणण्यास यशस्वी होईल असे सांगण्यात येत आहे. कारण पेडणे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेला लागुन आहे. आणि कोकणी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. आणि आदित्य ठाकरे यांच्या सभे नंतर वातावरण हे शिवसेना मय झाल्याची चर्चा होत आहे.
आणि मापुसा मतदारसंघात तर शिवसेनेचे गोवा राज्यप्रमुख जितेश कामत हे जोरदार लढत देत आहे आणि शेवटच्या दिवसात आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघात जोरदार रोड शो केल्याने ह्या मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.
No comments