मणिपुर : दोन आमदारांसह माजी मुख्यमंत्री पुत्र शिवसेनेत.
मणिपुर : दोन आमदारांसह माजी मुख्यमंत्री पुत्र शिवसेनेत.
दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले काॅंग्रेसचे दिवंगत नेते राजकुमार दोरेद्र सिंग यांचे चिरंजीव आर. के. सुरज सिंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या शिवाय दोनवेळा भाजपचे आमदार व विधान परिषदेचे उपसभापती राहिलेले भाजपचे थांगझलम हाओकिप,भाजपचेच असेम बाबू सिंग आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यामुळे शिवसेनेला या राज्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बिहार व अन्य राज्यापेक्षा मणिूपरमध्ये संघटनात्मक बांधणी चांगली झाली आहे. प्रचारसभा, पदयात्रा, काॅर्नर बैठकांना मिळणारा प्रतिसाद देखील उत्साह वाढवणार आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये शिवसेना खाते उघडेल, असा विश्वास मला आहे.
राज्यातील शिवसेनेचे राज्यप्रमुख मोंटेसिंग यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यात अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत राजकुमार दोरेंद्रो सिंग यांचे चिरंजीवर आर.के.सिंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दोरेंद्र सिंग हे शेवटच्या काळात भाजपमध्ये देखील कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर आर. के.सिंग नव्या पक्षाच्या शोधात होते, त्यांनी शिवसेनेची निवड केली आणि पक्षाने त्यांना उमेदवारी देत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेच्या ९ पैकी दोन उमेदवार हे तगडे म्हणजेच विजय मिळवू शकतील असे आहेत. उर्वरित उमेदवार देखील आपापल्या मतदारसंघात चांगली काम करतील.
No comments