रविकांत तुपकर मातोश्रीवर दाखल !

 


रविकांत तुपकर मातोश्रीवर दाखल


आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी अनुकूल असल्याची चर्चा आहे.


शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तुपकरांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत तुपकरांनी अडीच लाख मतं खाऊन ठाकरे गटाचा उमेदवार पाडला होता. त्यामुळे शिंदेंचे प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार झाले.


लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर अपक्ष रिंगणात उतरले होते. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मतं मिळाली होती. ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांना ३ लाख २० हजार मतं मिळाली, तर साधारण साडेतीन लाख मतं मिळवत शिंदेंचे उमेदवार प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार झाले.


आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सकारात्मक असल्याचे बोलले जाते. मातोश्रीवरील भेटीत रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुठली चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

No comments