उद्धव ठाकरेंनी डाव टाकला ! मिलिंद नार्वेकर भरणार फॉर्म !


उद्धव ठाकरेंनी डाव टाकला ! मिलिंद नार्वेकर भरणार फॉर्म !


मिलिंद नार्वेकर हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असून अनेक वर्षांपासून ते निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.


विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मिलिंद नार्वेकर आज, मंगळवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

 


ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्याची अखेरच्या दिवशी कोण अर्ज भरतात, याकडे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांचे राईट हँड मानले जाणारे मिलिंद नार्वेकर आता विधिमंडळात आपला आवाज घुमवताना दिसणार आहेत.


मिलिंद नार्वेकर यांचे संसदीय राजकारणात हे पहिलेच पाऊल ठरणार आहे. नार्वेकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आहेत. ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. अनेक वर्षांपासून ते ठाकरे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.


खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नार्वेकरांना पक्षात प्रवेशाची ऑफर दिल्याच्या चर्चा अनेक वेळा रंगत असत, अगदी त्यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या खासदाराविरोधातच मैदानात उतरवण्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र त्यात तथ्य आढळलं नाही. अर्थातच मिलिंद नार्वेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असता, तर तो ठाकरेंनाही मोठा धक्का ठरला असता.

No comments