राजन विचारे ठाणे शहर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर
राजन विचारे ठाणे शहर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर
ठाणे शहर या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात भाजप विरोधात माजी खासदार राजन विचारे यांनाच रिंगणात उतरविण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरु असून उमेदवारी मिळत नसल्याने नाराज असलेले शिंदे गटातील काही नाराज गळाला लागतात का, याची चाचपणीही केली जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या १८ जागा महत्वाच्या असून महापालिका हद्दीत असलेल्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघावरही त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यापैकी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार असले तरी हा मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो.
शिवसेना ठाकरे गटातून ठाणे शहर विधानसभेसाठी राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
No comments