उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला !

 



उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला !


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते. 


या पत्रकार परिषदेत ज्या ज्या भागात शिवसेना ठाकरे गटाचे मतदान जास्त आहे, त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने पार पडत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. 


त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात जास्त मतपत्रिका आढळल्याची माहिती मिळत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे.


उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करत नेमकी काय घटना घडली याबाबतची माहिती घेतली. जर मतपत्रिका सील केलेल्या असतील तर पाच मतपत्रिका जास्त आल्या कशा? आणि कुठल्या जिल्ह्यातल्या याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. 


यानंतर शिवसेना ठाकरे गटाने यावर नेमका काय आक्षेप घेतला आणि त्याचे पुढे काय होणार याची देखील त्यांनी माहिती घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे प्रत्येक मतदारसंघाकडे बारीक लक्ष असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments