गद्दार पितापुत्रानां पक्षात घेणार नाही ! पक्षात घेण्याची विनंती उद्धव ठाकरेनीं केली नामंजूर



गद्दार पितापुत्रानां पक्षात घेणार नाही ! पक्षात घेण्याची विनंती उद्धव ठाकरेनीं केली नामंजूर 


लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने महायुतीमधील आमदारांत प्रचंड नाराजी दिसत आहे. यामधील काहीजण महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे.


या पार्श्वभूमीवरच गुरुवारी अजित पवारांच्या गटांतील काही नाराज आमदारांनी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा दिवसभर विधिमंडळ परिसरात ऐकवयास मिळत होती. त्यातच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडील एका माजी आमदाराने उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.


विधिमंडळातील अधिवेशनासाठी गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर पहिला दिवस गाजला तो लिफ्टमधील देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे. त्यानंतर, आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेसोबत एकनाथ शिंदे गटातील पितापुत्राची झालेल्या भेटीची चर्चा सध्या प्रसार माध्यमात जोरात रंगली आहे.


यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडून गेलेल्यांबाबत विचार करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच विप्लव बजोरिया हे विधानपरिषदेतून निवृत्त झाले आहेत. विधानपरिषेदेचे आमदार म्हणून त्यांनी 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, निवृत्तीनंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेना शिंदेंच्या गटात खळबळ उडाली आहे.

No comments