संभाजीनगर मध्ये भाजपचे 8 ते 10 नगरसेवक ठाकरे गटात !
संभाजीनगर मध्ये भाजपचे 8 ते 10 नगरसेवक ठाकरे गटात !
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत आहे. येथे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येथील अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीच तयारी चालू केली आहे. विधानसभेसाठी पक्षाचे बळ कसे वाढेल, यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. काही पक्षांनी तर वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी योग्य उमेदवारांचा शोधही चालू केला आहे. असे असतानाच शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी खेळली आहे.
येथे लकवरच भाजपाचे अनेक माजी नगरसेवर, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठकरे यांच्या या खेळीमुळे भाजपाचे नेते तथा मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या या खेळीमुळे अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या प्रयत्न केला आहे.
8 ते 10 माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
No comments