भाजपचे विदर्भातील 3 ते 4 आमदार क्रॉस व्होटिंग करणार !

 


भाजपचे विदर्भातील 3 ते 4 आमदार क्रॉस व्होटिंग करणार ! 


विधान परिषद निवडणुकीनंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या फोडाफोडीनंतर राज्यात सत्ता बदलेली होती. त्यावेळेसपासून राजकारणाने कुसच बदलली होती. मात्र, दोन वर्षात आता बरेच पुलाखालून पाणी गेले आहे.


आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषद निवडणुकीनंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या फोडाफोडीनंतर राज्यात सत्ता बदलेली होती. हा सत्ता बदल त्यावेळी भाजपच्या बाजूचा होता. त्यावेळेसपासून राजकारणाने कुसच बदलली होती. मात्र, दोन वर्षात आता बरेच पुलाखालून पाणी गेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले.


48 पैकी 30 जागा मिळवत महायुतीचा पराभव केला तर पदवीधरच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने दोन जागा मिळवत बरोबरी साधत यश मिळाले. त्यामुळे या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन जागा निवडून येतील, असे चित्र असल्याचे सांगितले जात आहे.


ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांचे सर्व पक्षात चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते उर्वरित सात ते आठ मते घेऊ शकतील असे चित्र आहे. माहितीनुसार विदर्भातील भारतीय जनता पक्षाचे 3 ते 4 आमदार हे मिलिंद नार्वेकर यांना व्होट करू शकता.


दुसरीकडे जयंत पाटील यांचा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते पण उर्वरित मते खेचून आणतील. त्याशिवाय काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्याकडे कोट्यापेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे त्यांना कसलाच धोका नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीन जागा सहज विजयी होतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

No comments