माहीम मधुन शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरला !
माहीम मधुन शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरला !
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर ठाकरे गटातून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर, शिंदेंकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवणार आहेत. अशातच आता सर्वांचं लक्ष ठाकरेंकडे लागलं आहे. ठाकरे पुतण्याविरोधात उमेदवार देणार की, आपली हक्काची जागा मित्रपक्षांना सोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमित ठाकरेंपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदा 2019 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवलेले पहिले व्यक्ती होते. 2019 च्या निवडणुकीत, ज्यावेळी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी काका राज ठाकरे यांनी मात्र वरळीतून उमेदवार उभा केला नव्हता. अशातच आता उद्धव ठाकरेंचे पुतणे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अद्याप ठाकरे गटाकडून यादी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
No comments