ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार ठरला !
ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार ठरला !
कर्जत-खालापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. शिवसेना उबाठा गटाचे नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कर्जत खालापूर मतदार संघात विद्यमान शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून सध्या कोणाला उमेदवारी मिळणार ही चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीकडून डॉक्टर सुनील पाटील आणि नितीन सावंत यांची नावे चर्चेत असताना अखेर नितीन सावंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.
नितीन सावंत हे कर्जत नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत. शिवाय ते उत्तर रायगडचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुद्धा आहेत. नगरपरिषदेची निवडणूक लढवून नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी राजकारणात स्वतःला सक्रिय केलं. शिवसेना पक्ष फुटीनंतर कर्जत खालापूर मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बळ देण्याचं काम त्यांनी केलं. पक्षाला नवसंजीवनी देऊन त्यांनी पक्षाची ताकद वाढविली.
मागील लोकसभेला उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना 18 हजार मतांचं लीड त्यांनी मिळवून दिलं. अनेक रोजगार मेळावे घेऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महिलांसाठी पैठणीचा खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन त्यांनी केले आहे. विधानसभेतील ग्रामपंचायतींवर जास्तीत जास्त संख्येने शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवला आहे.
No comments