भाजपचे माजी आमदार बाळ माने लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार !
भाजपचे माजी आमदार बाळ माने लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार !
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत उड्या सुरू झाल्या आहेत. यातच कोकणातील बडे नेते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात उलट्या दिशेने वारे वाहत आहे. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट ) आणि काँग्रेसच्या संपर्कात आहेत. यातच भाजपचा बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हे भाजपचे माजी आमदार म्हणजे बाळ माने. सध्या बाळ माने हे शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रत्नागिरीत सुरू आहे. माने दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी माने यांनी साडू आणि आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबर 'मातोश्री'वर गेले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची भेट घेतल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांना तिकीट मिळणार नसल्याची खात्री पटली आहे. म्हणून बाळ माने यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, बाळ माने यांनी कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. पण, माने यांच्या प्रवेशानंतर कोकणात शिवसेनेला ( ठाकरे गट ) बळ मिळणार आहे. तसेच, भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं.
No comments