भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे शिवसेनेत प्रवेश करणार !!

 


भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे शिवसेनेत प्रवेश करणार !!


महाराष्ट्रात जेव्हा पासुन महाविकास आघाडीच सरकार आले तेव्हा पासुनच हे सरकार निवडणुकीत टीकु शकणार नाही अशी वल्गना भारतीय जनता पक्षाचे नेते करत होते.


परंतु नंतर झालेल्या पदवीधर आणि शिक्षक आमदारकीची निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस याच्या महाविकास आघाडीने ऐकी दाखवुन भारतीय जनता पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधानी होण्यास भाग पाडले. त्या नंतर त्यानी येणार्या ग्रामपंचायत निवडणुकात भारतीय जनता पक्ष मोठं यश मिळवेल अशी वल्गना केली.


परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले आणि शिवसेना एक नंबर चा पक्ष बनला हे आणि राष्ट्रवादी आणि भाजपाला जवळपास सारख्या जागा मिळाल्या. त्या नंतर शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाल्या चे चित्र पाहायला मिळत होते आता त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार कृष्णा हेगडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल, कृष्णा हेगडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रवेशा मुळे भारतीय जनता पक्षाला मुबंईत मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे

No comments