नारायन राणेनां धक्का !! शेकडो राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
नारायन राणेनां धक्का !! शेकडो राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
जेव्हा पासुन ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले आणि शिवसेना एक नंबर चा पक्ष बनला आहे आणि राष्ट्रवादी आणि भाजपाला जवळपास सारख्या जागा मिळाल्या. त्या नंतर शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाल्या चे चित्र पाहायला मिळत होते आता त्याचाच एक भाग म्हणून चार दिवसा पुर्वी भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे माजी सचिव समीर देसाई यानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
आणि त्याच्या पत्नी नगरसेवक असुन त्या भारतीय जनता पक्षात आहे. आणि गोरगाव प्रभागातील त्या नगरसेवक आहे आणि त्या प्रभागातील 5 पैकी 5 नगरसेवक हे निवडणुकीपुर्वी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणि आता कोकणात सुध्दा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भारतीय जनता पक्षाला म्हणजेच नारायन राने यांना जोरदार धक्का दिला आहे.
कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला तसेच नेरुर दुर्गवाड येथील शेकडो राणे समर्थकांनी शनिवारी रात्रौ शिवसेना पक्षात प्रवेश केला.या प्रवेशामुळे याठिकाणी भाजप पक्षाला खिंडार पाडले आहे.कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधुन पक्षाच्या शाली घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले.
या प्रवेशा मुळे भारतीय जनता पक्षाला मुबंईत मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये
No comments